Filtra per genere

मेतकूट (मराठी पॉडकास्ट) | Metkoot (Marathi Podcast)

मेतकूट (मराठी पॉडकास्ट) | Metkoot (Marathi Podcast)

Vatvatkaar

वेगवेगळ्या विषयांची, वेगवेगळ्या मतांची सरमिसळ आणि दिलखुलास चर्चा. मराठी पॉडकास्ट | Marathi Podcast वटवटकार: सागर, पराग आणि रोहित लोगो: राजेश गोडे #मेतकूट #मराठी #पॉडकास्ट #म #गप्पा #पॉडकास्ट #marathi

32 - S3.E03 इकिगाई: समाधानी आयुष्याचा गुरुमंत्र
0:00 / 0:00
1x
  • 32 - S3.E03 इकिगाई: समाधानी आयुष्याचा गुरुमंत्र

    वत्सा, तुला काय पाहिजे तो वर माग असं विचारलं तर बिनधास्त "इकिगाई" ची डिमांड करावी.

    समोर मांडून ठेवलेल्या या आयुष्याच्या पसाऱ्यात समाधान कशात शोधायचं? अशा या क्लिष्ट वाटणाऱ्या प्रश्नाचं जपानी लोकांनी शोधलेलं साधं उत्तर म्हणजे "इकिगाई". आनंदी, निरोगी आणि दीर्घायुषी जीवनासाठी काही सोपे मूलमंत्र जे अनेक गोंधळून टाकणाऱ्या परिस्थितीत वाट दाखवू शकतात.

    #मेतकूट #मराठी #पॉडकास्ट

    Sun, 18 Jun 2023 - 45min
  • 31 - S3.E02 काय हवं? चहा की कॉफी?

    चहा, कॉफी किंवा त्यापेक्षा अधिक उत्तेजक पेयांबद्दल (आणि तत्सम सवयींबद्दल) केलेला हा खल !

    असं करता करता आम्ही चीन, जपान, मकाऊ आणि ध्यान-धारणा वगैरे ठिकाणहून चक्कर मारून परत एक-एक कप च्या प्यायला मूळपदावर परतलो

    #मेतकूट #मराठी #पॉडकास्ट

    Sun, 11 Jun 2023 - 30min
  • 30 - S3.E01 सरकार पुरस्कृत चोरी?

    तुम्ही आत्तापर्यंत काही देशात सुरु असलेला सरकारपुरस्कृत दहशतवाद ऐकला असेल. पण एक असा नमुनेदार देश आहे जो चक्क (डिजिटल) चोऱ्या / डाके / वाटमाऱ्या करण्यात अगदी निष्णात झाला आहे. ऐका त्याची ही डोकं चक्रावून टाकणारी गोष्ट जी पाहता पाहता आपल्या पुणे कोल्हापूरपर्यंत येऊन ठेपली.

    Sun, 04 Jun 2023 - 37min
  • 29 - तिसऱ्या सत्राची नांदी

    थोडा आळस, काही महत्तवाची कामं व वाढते व्याप यात जरा व्यस्त झाल्यामुळे दुसऱ्या सत्रानंतर आम्ही जरा थंडावलो, पण थांबलो मुळीच नाही… येत आहोत लवकरच तुमच्या भेटीला तिसऱ्या सत्रात नवनवीन विषय घेऊन

    Tue, 30 May 2023 - 00min
  • 28 - S2.E11 - दुसऱ्या सत्राची सांगता... लवकरच पुन्हा भेटू

    चला तर मग मेतकुटच्या दुसऱ्या सत्राची सांगता करण्याची वेळ आलेली आहे. गेल्या सत्राप्रमाणेच याही सत्रात साथ दिल्याबद्दल सर्वांचे खूप धन्यवाद. यावेळी आमच्याबरोबर आपापल्या क्षेत्रात पारंगत, आपापल्या विषयांवर प्रेम करणारी आमची काही मित्रमंडळी सुद्धा होती. त्यामुळे गप्पांचा आवाका (आणि हो... लांबी सुद्धा) जी वाढली त्याबद्दल सुद्धा त्यांचे आभार. या सत्रात नेहमीप्रमाणेच नवे विषय, त्याच्या नव्या बाजू, नवी पुस्तकं हे तर समजलंच पण नवे शब्द, नवे पदार्थ आणि अर्थ नियोजनाच्या क्लुप्त्या सुद्धा सापडल्या. आपण सगळे एकमेकांपेक्षा इतके वेगळे असूनही केवढे एकमेकांना जोडले गेलेलो आहोत, हे प्रकर्षाने जाणवलं.   

    आणि हाच दुवा मनात ठेवून तुम्हा सर्वांचा निरोप घेतो आहोत. लवकरच तिसरे सत्र घेऊन परत येऊ. तोपर्यंत दुवा में याद रखना. प्रतिक्रिया कळवत राहा. या गप्प्पा तुमच्या मित्र आणि परिवारापर्यंत पोचवत राहा.

    ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

    प्रतिक्रियेसाठी: YouTube / Facebook / Instagram / Twitter

    Sun, 27 Mar 2022 - 41min
Mostra altri episodi