Podcasts by Category

Sakalchya Batmya / सकाळच्या बातम्या

Sakalchya Batmya / सकाळच्या बातम्या

Sakal Media News

रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात आता सगळं माहित असणं गरजेचं झालं आहे. रोजचं तापमान काय त्याबरोबर, कांदा आणखी किती रडवणार, भाजी आणखी किती महागणार, पेट्रोल खिसा रिकामा करणार का, याच्या जोडीला जगात काय चाललंय याचा आढावा गरजेचा झाला आहे. या सगळ्याची माहिती तुम्हाला मिळणार आहे सकाळच्या 'पॉडकास्ट' वर. त्यात तुम्ही ऐकणार आहात महत्वाच्या ३ बातम्या. याशिवाय हेल्थ, लाईफ स्टाईल, एंटरटेंनमेंट, बँकिंग, ट्रॅव्हल सारख्या क्षेत्रातील अपडेट्सही मिळणार आहेत. चला तर मग आता ऐकायला सुरुवात करुया... सकाळ पॉडकास्ट. In the hustle of our daily lives, it is also important to keep a tab on whats happening around us.  News such as the petrol prices, vegetables prices, daily weather and all other things that directly impact our daily lives seem to be lost in the information overdose. To bring your attention to what matters, Sakal brings to you Sakal Chya Batmya. A crisp and brief podcast focused on providing you with 3 important news of the day. Along with, special features on banking, travel, lifestyle, health and entertainment for you. Subscribe Now! Morning news, daily news, news in marathi, sakal news  Produced by: Ideabrew Studios Millions of listeners seek out Bingepods (Ideabrew Studios Network content) every day. Get in touch with us to advertise, join the network or click listen to  enjoy content by some of India's top audio creators. studio@ideabrews.com Android | Apple

2010 - Sakal Chya Batmya | एसटी कर्मचाऱ्यांना १० हजार रुपयांची दिवाळी भेट ते स्वाभिमानीच्या आंदोलनाने महामार्ग ठप्प
0:00 / 0:00
1x
  • 2010 - Sakal Chya Batmya | एसटी कर्मचाऱ्यांना १० हजार रुपयांची दिवाळी भेट ते स्वाभिमानीच्या आंदोलनाने महामार्ग ठप्प

    १) एसटी कर्मचाऱ्यांना अखेर गोड बातमी! ८३ हजार कर्मचाऱ्यांना १० हजार रुपयांची दिवाळी भेट; महागाई भत्ता ६० टक्क्यांवर २) ऊस दरासाठी पश्चिम महाराष्ट्रात चक्काजाम! पुणे-बंगळुरू महामार्ग ४५ तास ठप्प; राजू शेट्टींच्या आंदोलनामुळे एसटीच्या १६६ फेऱ्या रद्द ३) दिवाळीच्या फराळावर ‘एफडीए’चा कडक पहारा! ९ हजार आस्थापनांची झाडाझडती; तुकाराम मुंढेंनी ९५४ परवाने केले निलंबित ४) गोकुळ दूध संघ वादावर माजी सरन्यायाधीश बी. आर. गवईंचा निर्वाळा; स्वीकृत संचालकांना मतदानाचा अधिकार संविधानात टिकणार नाही ५) अँटिलिया स्फोटके व मनसुख हिरेन प्रकरण; माजी पोलीस अधिकारी सचिन वाझेचा जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळला ६) क्रिकेटच्या २५४ वर्षांच्या इतिहासात न घडलेला चमत्कार! मराठमोळ्या चिन्मय सुतारने रणजीत मोडला १०१ वर्षे जुना वर्ल्ड रेकॉर्ड ७) दिवाळीच्या मुहूर्तावर बॉक्स ऑफिसवर 'रामायण'चे वादळ! पहिल्याच दिवशी ऐतिहासिक कमाई; आदिनाथ कोठारेच्या भूमिकेचे कौतुक स्क्रीप्ट अँड रिसर्च – विनयन वाघमारे

    Fri, 06 Nov 2026
  • 2009 - Sakal Chya Batmya | अमेरिकेत ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाचा दारुण पराभव ते राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना प्रत्येकी ५ हजार रुपयांची मदत

    १) अमेरिकेत मध्यावधी निवडणुकीत ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाचा दारुण पराभव! दोन्ही सभागृहांत डेमोक्रॅट्सचे वर्चस्व; शेअर बाजार, सोन्यात तेजी २) निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! मतदार नोंदणीच्या 'फॉर्म ६' मधून 'SIR' चा कॉलम हटवला; दोन आयुक्तांचा होता आक्षेप ३) सैन्यदलांतील अग्निवीरांसाठी आनंदाची बातमी! सेवाकाळात २ वर्षांची वाढ; आता ४ ऐवजी ६ वर्षांची सेवा मिळण्याची शक्यता ४) राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा! पुढील दोन दिवसांत ९५ टक्के शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्येकी ५ हजार रुपये जमा ५) ऐन दिवाळीत एसटी कर्मचाऱ्यांची संपाची हाक! प्रलंबित मागण्यांवरून संघटना आक्रमक; प्रवाशांचे हाल होण्याची शक्यता ६) वाहतूक नियम मोडणाऱ्या वाहनधारकांना 'गुड न्यूज'! प्रलंबित दंडासाठी 'पोलीस चलन अभय योजना'; २० टक्क्यांपर्यंत सवलत ७) पहिल्या वनडेत न्यूझीलंडवर टीम इंडियाची ५ विकेट्सने मात! पावसाच्या व्यत्ययानंतर संयमी विजय; विराटकडून अर्धशतकाची भेट स्क्रीप्ट अँड रिसर्च – विनयन वाघमारे

    Thu, 05 Nov 2026
  • 2008 - Sakal Chya Batmya | महाराष्ट्रावर दुष्काळाचे सावट ते धनत्रयोदशीपूर्वीच सोने-चांदीचे भाव कोसळले

    1) 'एल निनो'मुळे महाराष्ट्रावर दुष्काळाचे सावट; पाणीटंचाई, महागाई वाढण्याची भीती 2) ‘12 वर्षांत 50 कोटी लोकांनी गरिबीवर मात केली’; पंतप्रधान मोदींचा दावा 3) आंदोलन करा, पण ठरावीक वेळेतच! CJI सूर्यकांत काय म्हणाले? 4) धनत्रयोदशीपूर्वी सोनं-चांदीचे भाव कोसळले! सोनं 43 हजारांनी, तर चांदी 2.43 लाखांनी स्वस्त 5) ट्रम्प यांच्या लोकप्रियतेची कसोटी; अमेरिकेतील मतदान अन् निकालांकडे जगाचे लक्ष 6) आज भारत विरुद्ध न्यूझीलंड मालिकेतील पहिला वनडे सामना 7) ‘कौन बनेगा करोडपती’मध्ये माधुरी दीक्षितचा मराठमोळा ठसका! प्रोमो Viral स्क्रीप्ट अँड रिसर्च – अशोक जावळे

    Wed, 04 Nov 2026
  • 2007 - Sakal Chya Batmya | राज्यभरातील न्यायालयांना बॉम्बच्या धमकीचा मेल ते जीएसटी संकलनात महाराष्ट्राची ऐतिहासिक भरारी

    १) राज्यभरातील न्यायालयांना बॉम्बने उडवून देण्याची ईमेलद्वारे धमकी! न्यायालयीन संकुले तातडीने केली रिकामी; पोलीस, एटीएसकडून कसून तपास २) जीएसटी संकलनात महाराष्ट्र देशात पुन्हा अव्वल! ऑक्टोबरमध्ये देशात २.३१ लाख कोटींचा ऐतिहासिक महसूल; २३ टक्क्यांची विक्रमी वाढ ३) दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिलासा! राज्यातील ९७ टक्के बाधित क्षेत्राचे पंचनामे पूर्ण; दिवाळीपूर्वी थेट बँक खात्यात आर्थिक मदतीची तयारी ४) सरकारी कर्मचाऱ्यांना जादा मिळालेल्या वेतनाची वसुली वैध! हमीपत्र दिले असल्यास कारवाईचा सरकारला अधिकार; मुंबई उच्च न्यायालयाचा निकाल ५) धनत्रयोदशीपूर्वी सराफा बाजारात मोठी उसळी! चांदी प्रति किलो ३ हजारांनी महागली; सोन्याचे दरही उच्चांकी पातळीवर ६) रणजी करंडकात विदर्भाच्या हर्ष दुबेचा ऐतिहासिक विश्वविक्रम! मध्य प्रदेशविरुद्ध अवघ्या ५३ धावांत ९ बळी; मोडला सर्वकालीन विक्रम ७) ‘झी मराठी पुरस्कार २०२६’ मध्ये ‘सनई चौघडे’ सर्वोत्कृष्ट मालिका! तेजश्री प्रधानच्या मालिकेला १३ पुरस्कार; इला भाटेंना जीवनगौरव स्क्रीप्ट अँड रिसर्च – विनयन वाघमारे

    Tue, 03 Nov 2026
  • 2006 - Sakal Chya Batmya | ‘ज्ञानेश कुमारांशिवाय मोदी पंतप्रधान झालेच नसते!’ राहुल गांधींचा हल्लाबोल ते MPSC पेपरफुटीवर न्यायमूर्ती भोसलेंचा मास्टरप्लॅन

    १) ‘ज्ञानेश कुमारांशिवाय मोदी पंतप्रधान झालेच नसते!’ राहुल गांधींचा घणाघात; रामलीला मैदानावर ‘इंडिया’ आघाडीचा एल्गार २) दिवाळीच्या फराळावर ‘एफडीए’ची करडी नजर! तेल, मसाले आणि रंगांची तपासणी; तुकाराम मुंढेंचा भेसळखोरांना कडक इशारा ३) MPSC पेपरफुटी कशी रोखणार? निवृत्त न्यायमूर्ती दिलीप भोसले यांनी मांडला मास्टरप्लॅन; परीक्षा केंद्रांवरच २ तास आधी पेपर प्रिंटिंगचा नवा पर्याय ४) “...तर युद्धाची वेळ अन् अटी इराण ठरवेल!” सर्वोच्च नेते मोजतबा खामेनींचा अमेरिका आणि इस्रायलला थेट इशारा ५) बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाची निर्मिती! राज्यात ३ दिवस पावसाचा इशारा; विदर्भाला यलो अलर्ट ६) सामना गमावला, पण मालिका भारताचीच! न्यूझीलंडविरुद्ध ३-२ ने विजय; ईशान किशनने मोडला सूर्यकुमारचा वर्ल्ड रेकॉर्ड ७) टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात बारावा आरोपी गजाआड! आर्थिक रसद पुरवणाऱ्या अमर मुंडियाला हरियाणातून अटक स्क्रीप्ट अँड रिसर्च – विनयन वाघमारे

    Mon, 02 Nov 2026
Show More Episodes