Filtra per genere

काजळ टिकली आणि कविता

काजळ टिकली आणि कविता

Samiksha S Salunke

एका साधारण रंगरूपाच्या स्त्री ने केवळ काजळ आणि टिकलीच्या जोरावर सौदर्याच्या परिसीमा गाठाव्यात तशीच कोणतीही भाषा कवितेच्या जोरावर जनमनाचा ठाव घेत असते. एका कवितेचा जन्म, तिच्यामागचा विचार, तिच्यातून मांडलेले प्रश्न आणि मिळालेली उत्तरं... प्रत्यक्ष कवितेपेक्षाही हे मुद्दे कधी कधी जास्त महत्त्वाचे ठरतात.. मी या कार्यक्रमातून माझ्याच काही कवितांमागच्या कहाण्या आपल्यासमोर उलगडणार आहे.

13 - १२ | या'अबुरने Ya'aburnee | Samiksha Salunke | Kaajal Tikli Ani Kavita | You bury me
0:00 / 0:00
1x
  • 13 - १२ | या'अबुरने Ya'aburnee | Samiksha Salunke | Kaajal Tikli Ani Kavita | You bury me

    'या अबुरने' याचा शब्दशः अर्थ 'तू मला दफन कर..' असा होतो . यामागची भावना मात्र आहे एका आशेची, की तुझ्या आधी मला मरण यावं कारण तुझ्या प्रेमाशिवाय जगणं मुश्किल आहे..

    Fri, 01 Oct 2021 - 04min
  • 12 - ११ | हल्ली बाप्पा लहान झालाय Samiksha Salunke | Kaajal Tikli Ani Kavita | #Ganpati #Bappa Special

    देवाच्या अस्तित्वावर रोज प्रश्नचिन्ह उभी राहत असली, तरी आपण आपल्या परंपरा चालवत राहतो.. आपापल्या बुद्धिनुसार अपडेट करत राहतो.. आणि कानगोष्टी खेळताना जसं होतं ना.. पहिल्या मुलाने सांगितलेली गोष्ट शेवटच्या मुलापर्यंत पोहोचेतो होत्याची नव्हती झालेली असते, तसंच काहीसं परंपरांचं होतं..

    Fri, 10 Sep 2021 - 05min
  • 11 - १० | दृष्टी | Sight काजळ टिकली आणि कविता Samiksha Salunke | Kaajal Tikli Ani Kavita 10

    कधी-कधी आपल्यासमोर असे प्रसंग उभे राहतात, की हेच पाहायला एवढा अट्टाहास केला का? असं आपल्याला वाटतं. जरा एक कॉमन डायलॉग सांगते, म्हणजे आपल्या लक्षात येईल, "देवा ss, हे पाहण्या आधी माझे डोळे का नाही मिटले.." माणसाला असलेलं दृष्टीचं वरदान हे एक बंधन केव्हा वाटू लागेल, त्यावर लिहिलेली ही कविता आहे..

    Mon, 23 Aug 2021 - 05min
  • 10 - ०९ | चिडिया और चिंटीया | Ant March काजळ टिकली आणि कविता Samiksha Salunke | Kaajal Tikli Ani Kavita 09

    मी रोज सकाळी ट्राफिक टाळण्यासाठी लवकरात लवकर घरातून बाहेर पडायचे आणि रस्त्याच्या डाव्या बाजूने जाणाऱ्या बजेट वाल्या दुचाकी घोड्यांच्या रांगेतून माझा सुंदर सोनेरी घोडा दामटवायचे. चारचाकी खिडक्यांतून आम्हा घोडेस्वारांवर पडणारे सिम्पथेटिक कटाक्ष मीदेखील दोन पायांनी धावत ऑफिस गाठणाऱ्या प्राण्यांवर टाकायचे आणि असं करत असताना आपणही त्या गर्दीचा भाग आहोत हे हमखास विसरून जायचे. तर याच रोजच्या रटाळ प्रसंगाला जरा वेगळ्या अँगल ने पाहण्याचा प्रयत्न मी या कवितेत केला आहे..

    Fri, 30 Jul 2021 - 04min
  • 9 - ०८ | शृंखला | Chain काजळ टिकली आणि कविता Samiksha Salunke | Kaajal Tikli Ani Kavita 08

    एका विचित्र अवस्थेतून जाणारं एक जोडपं.. प्रेम तर आहे; पण जशी स्वप्नं  पाहिली होती किंवा दाखवली गेली होती म्हणा, तसं ते काही बहरत वगैरे  नाहीये.. कुठेतरी अडलंय, खुंटलंय, एक बांध बसलाय त्यावर..  सहवासाने प्रेम  वाढतं हे ऐकून माहीत आहे पण 'अतिपरिचयात अवज्ञा' हे अनुभवाने नव्यानेच  माहीत झालंय. तर अशा एका जोडप्याची अवस्था मी या गझलेत मांडण्याचा प्रयत्न  केलाय..

    Fri, 23 Jul 2021 - 05min
Mostra altri episodi